-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
नुकतेच या मालिकेने १ हजार भाग पूर्ण केले आहेत.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.
-
लवकरच या मालिकेत ‘ईशा’ आणि ‘अनिश’चा विवाह सोहळा पार पडणार आहे.
-
‘देशमुख’ कुटुंबात प्रत्येक सण-समारंभ अगदी उत्साहात साजरा केला जातो.
-
फोटोग्राफर प्राजक्ता भावसारने ‘ईशा’च्या मेहेंदी सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ‘ईशा’ने पिवळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर ‘ईशा’ने गुबाली फुलांच्या ज्वेलरीने साज केला आहे.
-
अभिनेत्री अपूर्वा गोरे ‘ईशा’ची भूमिका साकारत आहे.
-
अपूर्वाला ‘ईशा’ या पात्रामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे आणि प्राजक्ता भावसार / इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल