-
‘मेड इन हेवन’चा बहुप्रतिक्षित दुसरा सीझन या महिन्याच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
या सीरिजच्या दुसऱ्या सीझनलाही पहिल्या सीझनप्रमाणेच प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.
-
या सीझनमध्ये इतर जुन्या कलाकारांबरोबरच मेहेर नावाचं नवीन पात्र पाहायला मिळालं. मेहेर नावाची ट्रान्सवूमन कर्मचारी तारा आणि करणच्या कंपनीत रुजू होते.
-
मेहेरची भूमिका साकारणारी त्रिनेत्रा हलदर ही गेल्या काही काळापासून इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.
-
तुम्हाला माहीत आहे का की ती भारतातील पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर देखील आहे?
-
होय, तुम्ही बरोबर वाचलंय. त्रिनेत्रा हलदर गुम्माराजु ही २६ वर्षांची ट्रान्स वूमन आहे.
-
ती डॉक्टर व कंटेंट क्रिएटर आहे. ती मूळची कर्नाटकमधील आहे. ती भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर कंटेंट क्रिएटर्सपैकी एक आहे.
-
ती देशातील पहिली ट्रान्सजेंडर फिजिशियन देखील आहे.
-
ती मणिपालमधील कस्तुरबा मेडिकल कॉलेजची वैद्यकीय पदवीधर आहे. तिने लिंगबदल शस्त्रक्रिया वयाच्या २१ व्या वर्षी केली होती.
-
एका मुलाखतीत त्रिनेत्राने सांगितलं होतं की ती घरातील मोठा मुलगा होती. पण तिला ती मुलगा असल्याचं वाटत नव्हतं.
-
तिला मुलांसारखं मैदानी खेळ खेळणं किंवा इतर कामं जी मुलांनी करायची अपेक्षित असतात ती जमली नाहीत.
-
तिने मुलासारखं वागावं, यासाठी तिच्या वडिलांनी शक्यतोपरी प्रयत्न केलं. पण ती मुलगा नाही हे समजायला तिला बरीच वर्षे लागली. सत्य समजल्यानंतर पालकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे जास्त अडचणी आल्या नाहीत, असं त्रिनेत्रा सांगते.
-
त्रिनेत्राने फोर्ब्सच्या अंडर ३० मध्ये चेंजमेकर श्रेणीत आपले नाव नोंदवले आहे.
-
फोर्ब्स मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्रिनेत्रा म्हणाली होती की, तिने करोनाकाळात लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता जो खूप आव्हानात्मक होता.
-
या शस्त्रक्रिएबद्दल ती खूप घाबरली होती. ट्रान्सजेंडर व्यक्तीला इतकी लोकप्रियता मिळू शकते, असं कधीच वाटलं नव्हतं, असं ती सांगते. (सर्व फोटो – त्रिनेत्रा हलदरच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

PBKS vs MI, Qualifier 2: श्रेयस अय्यर मानला रे तुला! मुंबईला आस्मान दाखवत पंजाबची फायनलमध्ये धडक