-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे प्राजक्ता माळी प्रसिद्धीझोतात आली.
-
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या नव्या फोटोशूटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
वेस्टर्न सूटमध्ये प्राजक्ता फारच सुंदर दिसत आहे. या फोटोंना खास कॅप्शन देत अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
“माझ्या फोनची रिंगटोन इंग्रजी गाण्याची आहे आणि फोनच्या रिंगटोन इच्छेनुसार मी वारंवार बदलत असते” असा खुलासा प्राजक्ताने कॅप्शनमध्ये केला आहे.
-
पुढे, अभिनेत्री तिच्या चाहत्यांना विनंती करत लिहिते, “आता मराठी गाणं रिंगटोनला का नाही? यावर कमेंट्समध्ये चर्चा नको.”
-
“आपलीच मराठी मुलगी प्राजक्ता माळी”, असं तिने कॅप्शनच्या शेवटी नमूद केलं आहे.
-
प्राजक्ताने लिहिलेल्या हटके कॅप्शनचं आणि फोटोशूटचं तिच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
-
दरम्यान, अभिनेत्री लवकरच ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात झळकणार आहे.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL