-
जवान : शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट 7 सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुख खानचे अनेक अवतार पाहायला मिळाले. यात शाहरुख खानही सैनिकाच्या भूमिकेत दिसला होता. जवान हिट की फ्लॉप, हे येणारा काळच सांगेल, पण याआधी शाहरुख खान जेव्हा जेव्हा गणवेश परिधान करून पडद्यावर दिसला तेव्हा हा चित्रपट हिट झाला आहे. चला एक नझर टाकूया:
-
जवान या चित्रपटात शाहरुख खान लष्करी जवानाच्या भूमिकेत आहे. शाहरुख खानने आतापर्यंत ६ चित्रपटांमध्ये लष्करी जवानाची, एका चित्रपटात वायूदलातील अधिकाऱ्याची तर एका चित्रपटात नौदल अधिकाऱ्याची भूमिका वठवली आहे. जेव्हा जेव्हा शाहरुख खानने ‘जवाना’चा गणवेश परिधान केला आहे, तेव्हा तेव्हा बॉक्स ऑफिसवर त्याने मोठं यश मिळवलं आहे.
-
फौजी : शाहरुख खानने १९८९ मध्ये टीव्ही सीरियल फौजीमध्ये आर्मी ऑफिसर बनून सर्वांची मनं जिंकली होती.
-
मैं हूं ना : २००४ मध्ये आलेल्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटात शाहरुख मेजर राम नावाच्या आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.
-
वीर झारा : २००४ मध्ये शाहरुख खान वीर झारा या चित्रपटात वायूदलाच्या गणवेशात दिसला होता. या चित्रपटात शाहरुख स्क्वाड्रन लीडर वीर प्रताप सिंहच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता.
-
भूतनाथ : शाहरुख खानने २००८ मध्ये आलेल्या भूतनाथ चित्रपटात छोटी भूमिका केली होती. या चित्रपटात तो नौदलाचा अधिकारी होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
जब तक है जान : २०१२ मध्ये शाहरुख जब तक है जान या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात दिसला होता. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता.
-
पठाण : दहा वर्षांनंतर २०२२ मध्ये शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटात त्याने थेट भारताच्या गुप्तहेराची भूमिका साकारली होती.
-
आर्मी : शाहरुख १९९६ मध्ये आलेल्या आर्मी चित्रपटातही एका सैनिकाच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. हा एकमेव चित्रपट आहे ज्यामध्ये शाहरुख खान सैनिकाच्या गणवेशात दिसला होता आणि चित्रपट फ्लॉप झाला होता.

IND vs PAK Live Score , Asia Cup 2025 Final: अभिषेक, सूर्यानंतर गिल परतला तंबूत! टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या