-
मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून बॉलिवूड चित्रपटातून समोर आलेल्या उदिता गोस्वामीने तिच्या करिअरमध्ये काही हटके अन् वेगळे चित्रपट केले, पण या इंडस्ट्रीत ती फार काल तग धरू शकली नाही, अन् कालांतराने ती या लाईमलाइटपासून दूर झाली.
-
उदीताने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली अन् ‘एमटीव्ही मॉडेल मिशन २’ची ती विजेती ठरली.
-
यानंतर उदिताने जाहिराती करायला सुरवात केली. नोकिया, पेप्सी, स्टार मुव्हिज, टायटन वॉचसारख्या बड्या ब्रॅंडच्या जाहिरातींमध्ये उदीत दिसू लागली.
-
उदिताने पूजा भट्ट दिग्दर्शित ‘पाप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. या चित्रपटात तिच्याबरोबर जॉन अब्राहमही प्रमुख भूमिकेत होता.
-
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नसला तरी उदिताला या चित्रपटासाठी उत्कृष्ट पदार्पणासाठी झी सिने अवॉर्डचं नामांकन मिळालं.
-
यानंतर उदिताच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. इम्रान हाशमीबरोबर ‘जेहर’ आणि ‘अक्सर’सारख्या चित्रपटातून उदिताला प्रसिद्धी मिळाली.
-
चित्रपटातील तिच्या बोल्ड सीन्सची आणि तिच्या बिनधास्त अंदाजाची सर्वत्र चर्चाही झाली.
-
जगातील १०० सुंदर महिलांच्या यादीतही उदिताला त्यावेळी स्थान मिळालं होतं.
-
यानंतर २०११ च्या दरम्यान उदिता लवकरच हॉलीवूडमध्ये एंट्री घेणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. इतकंच नव्हे तर उदिता हॉलिवूडच्या कित्येक सेलिब्रिटीजना भेटून आल्याचंही मीडिया रीपोर्टमधून समोर आलं होतं.
-
त्यावेळी उदिताने एका आंतरराष्ट्रीय मॅनेजरसुद्धा ठेवली असल्याची बातमी मीडिया रीपोर्टमधून समोर आली होती.
-
९ वर्षं दिग्दर्शक मोहित सूरीला डेट केल्यानंतर अखेर २०१३ मध्ये उदिताने त्याच्याशी लग्नगाठ बांधली व अभिनयाला कायमचा राम राम ठोकला. यानंतर उदिताने हॉलिवूडचा विचारही बंद केला.
-
मोहित सूरीने हे स्पष्ट केलं की उदिताला तिच्या कुटुंबाला प्राधान्य द्यायचं असल्याने आणि संगीत ही तिची आवड आणखी उत्तमरित्या जोपासण्यासाठी तिने अभिनयातून ब्रेक घेतला आहे.
-
यानंतर मात्र योग्य प्रशिक्षण घेत उदिताने डिस्क जॉकी म्हणजेच डिजे म्हणून स्वतःचं नवं करिअर सुरू केलं. उदिता ही भरतातील बहुतेक पहिली सेलिब्रिटी डिजे आहे.
-
त्यानंतर उदिता आणि मोहित यांच्या पोटी दोन मुलांनी जन्म घेतला ज्यांचं नाव आहे देवी व कर्मा सूरी.
-
सध्या उदिता एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक सेलिब्रिटी डिजे म्हणून चांगलीच लोकप्रिय झाली आहे. (फोटो सौजन्य : उदिता गोस्वामी इंस्टाग्राम अकाऊंट व इंडियन एक्सप्रेस)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…