-
अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनेता रोनित रॉय हे दोघेही मनोरंजन विश्वातील मोठे नाव आहेत.
-
या दोघांनीही आपल्या अभिनयाने सर्वांनाच आपले चाहते बनवले आहे.
-
श्वेता तिवारी आणि रोनित रॉय हे 22 वर्षांपूर्वी एकता कपूरच्या सुपरहिट टीव्ही शो ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये एकत्र दिसले होते. शोमधील त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.
-
‘कसौटी जिंदगी की’मध्ये रोनितने मिस्टर बजाजची भूमिका केली होती तर श्वेताने प्रेरणा नावाची मुख्य भूमिका केली होती.
-
श्वेता आणि रोनित यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या संबंधीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये दोन्ही कलाकार एकमेकांसोबत रोमँटिक पोजमध्ये दिसत आहेत.
-
दोघांनी फोटो शेअर करत लिहिले की लवकरच काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे.
-
श्वेता आणि रोनितच्या या फोटोंमुळे त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
-
दरम्यान, एका जाहिरातीसाठी श्वेता आणि रोनित एकत्र दिसले आहे. या जाहिरातीमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. (Photos: Ronit Roy/Instagram)

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”