-
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना ही सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
चित्रपटांबरोबरच ती तिच्या बोल्ड लूकमुळे बऱ्याचदा चर्चेत असते.
-
करिश्मा तन्ना तिच्या प्रत्येक लूकने तिच्या चाहत्यांना प्रभावित करत असते.
-
नुकतीच करिश्मा ‘स्कूप’ या हंसल मेहता यांच्या वेबसीरिजमध्ये झळकली.
-
ही वेबसीरिज चांगलीच गाजली व प्रेक्षकांनी करिश्माचं तोंडभरून कौतुकही केलं.
-
नुकतंच तिला या सीरिजसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘ओटीटी प्ले’ पुरस्कार जाहीर झाला.
-
या पुरस्कार सोहळ्याला करिश्माने हजेरी लावली. यासाठी तिने केलेला एक खास वेस्टर्न लुक तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता.
-
एका ग्रे रंगाच्या वेस्टर्न बोल्ड गाऊनमधील काही मोजके फोटोज करिश्माने तिच्या अकाऊंटवर शेअर केले.
-
या फोटोंमध्ये करिश्मा नेहमीप्रमाणेच कमालीची हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
-
या सोहळ्यातसुद्धा करिश्माच्या या आऊटफिटवरच कित्येकांच्या नजरा खिळल्या होत्या.
-
सोशल मीडियावर तिचा हा लुक प्रचंड व्हायरल होत आहे.
-
तिच्या चाहत्यांनी या फोटोवर कॉमेंट करत तिच्या हॉटनेसचं आणि फिटनेसचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य : करिश्मा तन्ना / इंस्टाग्राम पेज)

Vaishnavi Hagawane Case: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक, पिंपरी- चिंचवड पोलिसांची कामगिरी…