-
बॉलिवूडचा सुपस्टार म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
२०२३ वर्ष शाहरुखसाठी खूप चांगलं गेलं. त्याच्या ‘पठाण ‘आणि ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.
-
आज २ नोव्हेंबर रोजी शाहरुख खान ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने आपण शाहरुखने त्याच्या मुलाखतींमधून प्रेक्षकांना दिलेले १० महत्त्वाचे कानमंत्र आपण जाणून घेणार आहोत.
-
यशाबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला, “यश हे तुमचे चांगले शिक्षक नव्हे तर अपयश तुम्हाला आधिक नम्र बनवते.”
-
“तुम्ही जे काम करताय ते पुन्हा एकदा काळजीपूर्वक करा अन् त्या कामाचा सराव तुम्हाला अधिक उत्तम माणूस बनवेल. तुमच्या प्रत्येक कामाकडे पहिलं काम असल्याप्रमाणे बघा.”
-
“तुमची भीती ही तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा बनता कामा नये. त्या भीतीला तुमचं सर्वात मोठं शस्त्र बनवा.”
-
“या जगात फक्त एकच धर्म आहे तो म्हणजे कठोर परिश्रम.”
-
“तुम्ही तुमची गुपितं आईला सांगता, व तुम्हाला कशाची भीती वाटते याबद्दल तुम्ही तुमच्या वडिलांजवळ मोकळेपणाने मांडता. माझे आई आणि वडील दोघेही हयात नाहीत, त्यामुळे मी या दोन्ही गोष्टी अभिनयातून सादर करतो.”
-
“सामान्य असं काहीच नसतं, सामान्य म्हणजे जणू ती गोष्ट निर्जीव आहे.”
-
शाहरुखचे वडील त्याला कायम एक गोष्ट सांगायचे ती म्हणजे “जी लोक काहीच करत नाहीत ती लोक कमाल करून दाखवतात.”
-
“जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची अजिबात इच्छा नसेल, तुम्हाला ती गोष्ट मनापासून करायची नसेल तर ती टाळलेलीच बरी.”
-
“पैशाच्या मागे धावणं योग्य आहे, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असायलाच हवं, पण काय बरोबर काय चूक याची जाण तुम्हाला असायलाच पाहिजे.”
-
“श्रीमंत होण्याआधी तत्त्वज्ञानी होऊ नका.”
-
“दररोज सकाळी मी उठतो आणि स्वतःला सांगतो की हा माझ्या आयुष्यातील पहिला शॉट आणि आणि तो उत्तमच असला पाहिजे.”
-
“पैसा कमावणे काही गैर नाही, पण त्यासाठी स्वतःचा आत्मा कोणाकडेही गहाण ठेवू नका.” (फोटो सौजन्य : शाहरुख खान / फेसबुक पेज)

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव