-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.
-
गेली अनेक वर्ष त्या विविध मालिका, नाटक व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ‘रुपाली राजाध्यक्ष’ ही भूमिका साकारत आहेत.
-
ऐश्वर्या नारकर यांनी दिवाळीनिमित्त नुकत्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
नाकात नथ, पोपटी रंगाची साडी, गळ्यात नेकलेस असा पारंपरिक लूक अभिनेत्रीने दिवाळीनिमित्त केला होता.
-
यावेळी त्यांच्या गळ्यातील नेकलेसने विशेष लक्ष वेधून घेतलं.
-
ऐश्वर्या नारकर यांनी गळ्यात पारिजातकाची नक्षी असलेला नेकलेस परिधान केला होता.
-
या पारिजातकाच्या नेकलेसला साजेसे असे कानातले त्यांनी घातले होते.
-
ऐश्वर्या नारकरांच्या या सुंदर लूकवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…