-
मराठी मालिकांमध्ये काम केलेली आणि आता स्वतःचं स्वतंत्र युट्यूब चॅनेल असणारी उर्मिला निंबाळकर सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
फॅशन इन्फ्लुअन्सर म्हणून अनेक चाहते तिच्या व्हिडीओजना तुफान प्रतिसाद देत असतात.
-
तिच्याकडे साड्यांचंही उत्तम कलेक्शन आहे. विविध प्रदर्शनांत ती भेट देत असते. त्यावेळी ती विविध प्रकारच्या साड्याही खरेदी करत असते.
-
अशाच एका प्रदर्शनात खरेदी केलेली साडी उर्मिलाने दिवाळीनिमित्त नेसली होती.
-
गुलाबी रंगांची, गोल्डन बॉर्डर असलेली ही साडी उर्मिलावर खूलून दिसत होती.
-
एका हातात हिरवा चुडा आणि एका हातात घड्याळ घालून तिनं मस्त कॉम्बिनेशन जमवून आणलंय.
-
ती सतत तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
तिचा फॅशन सेन्स उत्तम असल्याने अनेकजण तिला फॉलो करतात.
-
तिला एक छान गोंडस मुलगा असून त्याच्यासोबतही ती फोटोशूट करत असते.
-
तिचा पतीही याच क्षेत्राशी निगडीत असल्याने हे जोडपं सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतात. (सर्व फोटो – उर्मिला निंबाळकर/इन्स्टाग्राम)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक