-
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली.
-
‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे सूत्रसंचालिका म्हणून तिला एक वेगळी ओळख मिळाली.
-
प्राजक्ता नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते.
-
सध्या अभिनेत्रीच्या अशाच एका फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
गुलाबी रंगाच्या या भरजरी घागऱ्यामध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.
-
तब्बल १२ किलोंचा घागरा घालून प्राजक्ताने हे सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या फोटोंना लक्ष वेधून घेणारं कॅप्शन देत असते.
-
या नव्या फोटोंना कॅप्शन देत अभिनेत्री लिहिते, “मूड मूड के सोडा…समोर बघूनही नीट चालता येत नव्हतं, हा घागरा तब्बल १०-१२ किलोंचा होता…पण होता सुंदर.”
-
दरम्यान, प्राजक्ता माळीच्या या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”