-
महाराष्ट्राची कलरफूल अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजा सावंतने जोडीदाराबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत नुकतीच साखरपुड्याची घोषणा केली.
-
पूजाने या फोटोंना “We are engaged…” असं कॅप्शन दिलं आहे.
-
पूजाने शेअर केलेल्या सुरुवातीच्या काही फोटोंमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या मनात पूजाचा होणारा नवरा कोण असेल? तो काय काम करत असेल? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले होते.
-
अखेर आज अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सर्वांसमोर उघड केलं आहे.
-
सिद्धेश चव्हाण असं अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो.
-
पूजाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
-
“लक्ष्मी नारायणाचा जोडा”, “सावंत टू चव्हाण”, “मिस्टर अँड मिसेस कलरफूल”, “भाऊजी नमस्कार…”, अशा असंख्य कमेंट्स अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.
-
पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या हातात साखरपुड्याची सुंदर अंगठी पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, गुपचूप साखरपुडा उरकल्यावर पूजा आणि सिद्धेश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
Bihar Election Exit Poll Results 2025 : बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार की विरोधकांचं ‘तेज’ दिसणार? एक्झिट पोल्स काय सांगतायत?