-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते-दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांना ओळखलं जातं. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी ५ डिसेंबर १९९८ मध्ये मेघना यांच्याशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचा आज २५ वा वाढदिवस आहे.
-
लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त रवी जाधव यांनी बायकोबरोबरचे काही Unseen फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मेघना आणि रवी जाधव यांची लव्हस्टोरी सुद्धा फारच फिल्मी आहे.
-
मेघना म्हणजे रवी जाधव यांच्या जवळच्या मित्राची बहीण. मित्राच्या घरी येणं-जाणं वाढल्यावर रवी आणि मेघना यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.
-
१४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी दिग्दर्शकाने मेघना यांना लग्नाची मागणी घातली होती.
-
रवी जाधव यांना होकार देण्यापूर्वी मेघना यांनी पूर्ण १ महिना विचार केला होता.
-
मेघनाच्या वडिलांनी लग्नापूर्वी रवी जाधव यांना एक महत्त्वाची अट घातली होती ती म्हणजे स्वत:चं घर घ्यावं.
-
सासऱ्यांची अट मान्य करत त्यांनी मोठ्या कष्टाने स्वत:चं घर उभं केलं आणि मेघनाशी लग्न केलं.
-
आज दोघांच्या सुखी संसाराला २५ वर्षे पूर्ण झाली असून या जोडप्याला एक मुलगा आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”