-
अभिनेत्री मुक्ती मोहन विवाह बंधनात अडकली आहे.
-
तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लग्नाची बातमी दिली.
-
तिने अभिनेता कुणाल ठाकूरशी लग्न केलं आहे.
-
“त्वयि सम्प्रेक्ष्य भगवान्स्त्वया हि विवाह्यते।” असं कॅप्शन देत मुक्तीने लग्नाचे फोटो शेअर केले आहे.
-
लग्नात तिने पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे, तर मॅचिंग शेरवानीमध्ये कुणालही सुंदर दिसत आहे.
-
या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
चाहते व मित्र-मैत्रिणी लग्नाच्या फोटोंवर कमेंट्स करून या नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.
-
मुक्तीने आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे.
-
‘ब्लड ब्रदर्स’, ‘साहेब, बीवी और गँगस्टर’, ‘हेट स्टोरी’ आणि ‘दारूवू’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
-
ती गायिका निति मोहन व डान्सर शक्ती मोहन यांची बहीण आहे.
-
कुणाल ठाकूरने नुकत्याच आलेल्या ‘अॅनिमल’मध्ये काम केलं होतं. याशिवाय तो कबीर सिंग व कसौटी जिंदगी की, यामध्येही झळकला होता.
-
(सर्व फोटो – मुक्ती मोहन इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल