-
‘अॅनिमल’ चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या खूप चर्चेत आहे.
-
या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली असून तिला नॅशनल क्रशही म्हटलं जात आहे.
-
तृप्ती डिमरीचा अॅनिमल हा पहिला चित्रपट नाही, पण तिला या चित्रपटाने ओळख मिळवून दिली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
-
तृप्तीने ‘पोस्टर बॉइज’ चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
-
‘बुलबुल’ व ‘कला’ हे तिचे मुख्य भूमिका असलेले चित्रपट आहे.
-
आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त तृप्ती अफेअरमुळे चर्चेत राहिली.
-
ती अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
-
काही महिन्यांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं. नंतर या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडिवरून अनफॉलो केलं
-
ब्रेकअपआधी कर्णेश व तृप्तीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये कर्णेश तृप्ती डिमरीच्या गालावर किस करताना दिसत होता.
-
“लोक तुमच्याबद्दल बोलत राहतील, तुम्ही काय करत आहात किंवा कराल किंवा तुम्ही जे काही एन्जॉय करत आहात याचा त्यांना काही फरक पडत नाही, ते तुमच्याबद्दल बोलतच राहतील,” अशी स्टोरी तृप्तीने ब्रेकअपनंतर पोस्ट केली होती.
-
कर्णेश आणि तृप्ती यांनी एकमेकांचे फोटो इन्स्टावर शेअर केले होते. पण ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांचे फोटो डिलीट केले होते.
-
कर्णेश व तृप्तीचं ब्रेकअप न होता, नातं पुढे गेलं असतं तर कदाचित आता ती अनुष्का शर्माची वहिनी असती. (फोटो – तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम)

Today’s Horoscope: आश्लेषा नक्षत्रात ‘या’ राशींना मिळणार धनलाभासह जोडीदाराची साथ; तुमच्या आयुष्यात काय नवं घडणार? वाचा सोमवारचे राशिभविष्य