-
‘द मोजार्ट ऑफ मद्रास’ म्हणून प्रसिद्ध असलेले एआर रेहमान हे भारतातील सर्वात श्रीमंत गायक आणि संगीतकार आहेत. ५७ वर्षीय रेहमान यांनी केवळ हिंदीतच नाही तर तमिळसह इतर भाषांमध्येही मधुर गाणी गाऊन लोकांना आपल्या आवाजाचे मंत्रमुग्ध केलं आहे.
-
पण तुम्हाला माहिती आहे का रेहमानचे लहानपणी कॉम्प्युटर इंजिनीअर होण्याचे स्वप्न होते पण वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि फी भरू न शकल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली.
-
ए.आर. रेहमान अवघ्या ९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडील गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.
-
त्यांचे वडील देखील संगीतकार होते आणि त्यांनी मल्याळम चित्रपट उद्योगासाठी संगीत दिले होते. अशा परिस्थितीत त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी पियानो शिकण्यास सुरुवात केली. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी पियानो वाजवण्यास सुरुवात केली.
-
हळूहळू त्यांच्या कामामुळे ते ओळखले जाऊ लागले आणि लवकरच त्यांना चित्रपटांमध्येही काम मिळू लागले. जीवनात अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आज तो आलिशान जीवन जगत आहे. आज ते सर्वाधिक कमाई करणाऱ्या गायकांपैकी एक आहेत.
-
ए.आर. रेहमान एका गाण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतात, तर लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ते एका तासाच्या परफॉर्मन्ससाठी १ ते २ कोटी रुपये फी घेतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १७४८ कोटी रुपये आहे.
-
ए आर रेहमान मुंबईमध्ये एका आलिशान घरात राहतात. २००१ मध्ये त्यांनी हे आलिशान घर घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या रिअल इस्टेट प्रॉपर्टीची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.
-
एआर रेहमान यांच्याकडे लक्झरी कार्सचेही कलेक्शन आहे, ज्यात जॅग्वार, मर्सिडीज आणि व्होल्वो कारचा समावेश आहे. या गाड्यांची किंमत सुमारे १ ते दीड कोटी रुपये आहे.
-
(सर्व फोटो: @arrahman/instagram)

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप