-
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली लाडकी देवयानी अर्थात शिवानी सुर्वे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (फोटो सौजन्य – शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)
-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेता अजिंक्य ननावरेशी शिवानी लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच दोघांचा साखरपुडा पार पडला. (फोटो सौजन्य – शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)
-
शिवानीने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. (फोटो सौजन्य – शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्रीने साखरपुड्यातील काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत लिहिलं आहे,”अखेर बंधनात.” (फोटो सौजन्य – शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)
-
७ ते ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर शिवानी-अजिंक्य आयुष्याच्या नव्या प्रवासाला लवकरच सुरुवात करणार
आहेत. (फोटो सौजन्य – अजिंक्य ननावरे इन्स्टाग्राम) -
साखरपुडा करत दोघांनी नव्या प्रवासाचा टप्पाला सुरू केला आहे. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
शिवानीने साखरपुड्यासाठी वेस्टर्न लूक केला आहे. फिकट जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला होता. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
अजिंक्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट आणि टोपी घातली होती. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
साखरपुड्यात दोघंही खूप सुंदर दिसत होते. एकमेकांना अंगठी घालताना दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत आहे. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
सध्या शिवानी-अजिंक्यला साखरपुड्या झाल्यानिमित्ताने कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छा देत आहेत. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
दरम्यान, शिवानी-अजिंक्य यांच्या नात्याला घरच्यांचा विरोध होता. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
हे फक्त आकर्षण आहे. तुमचे एकमेकांवर खरं प्रेम असेल तर एकत्र राहून दाखवा, असं दोघांच्या घरच्यांनी सांगितलं होतं. (फोटो सौजन्य – अजिंक्य ननावरे इन्स्टाग्राम)
-
घरच्यांचा या सल्ल्यानंतर शिवानी व अजिंक्यने लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य – अजिंक्य ननावरे इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर चार वर्षांनी कुटुंबीयांनी दोघांच्या नात्याला परवानगी दिली. (फोटो सौजन्य – अजिंक्य ननावरे इन्स्टाग्राम)
-
आता लवकरच शिवानी व अजिंक्य सात फेरे घेणार आहेत. (फोटो सौजन्य – शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल