-
मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
गौतमी-स्वानंद, मुग्धा-प्रथमेश, सुरुची-पियुष या जोडप्यांपाठोपाठ आता छोट्या पडद्यावरची आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे.
-
अभिनेत्री रुता काळेच्या लग्न सोहळ्यातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे अभिनेत्री रुता काळे घराघरांत लोकप्रिय झाली.
-
यामध्ये तिने अक्षराच्या बहिणीची म्हणजेच इराची भूमिका साकारली आहे.
-
रुताने लग्नात हिरवी नऊवारी साडी, नथ असा पारंपरिक लूक केला होता.
-
रुताला नोव्हेंबर महिन्यात तिचा बॉयफ्रेंड अभिषेक लोकनरने फिल्मी स्टाइलने प्रपोज केलं होतं. आता हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत.
-
रुता-अभिषेकच्या लग्नाला अभिनेत्री अनुजा साठे पती सौरभ गोखलेसह हजेरी लावली होती.
-
दरम्यान, रुता सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत असून यापूर्वी तिने ‘गोठ’ या मालिकेत देखील काम केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रुता काळे इन्स्टाग्राम )
७ डिसेंबर तारीख लक्षात ठेवा; ‘या’ ३ राशींचं नशीब रातोरात पालटणार; ३० वर्षांनी शनिचा शक्तिशाली राजयोग आयुष्य झटक्यात बदलणार