-
अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखली जाते.
-
इलियाना डिक्रूझने २००६ साली एका तेलगू चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. २०१२ मध्ये ती ‘बर्फी’ या हिंदी चित्रपटात दिसली होती.या चित्रपटासाठी तिला ‘फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल डेब्यू’ मिळाला होता.
-
या अभिनेत्रीने त्यानंतर मैं तेरा हिरो (२०१४), रुस्तम (२०१६) आणि रेड (२०१८) यांसारख्या यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या.
-
इलियाना डिक्रूझने गुरुवारी तिचा पार्टनर मायकेल डोलनसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला. हा फोटो या जोडप्याच्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचा आहे.
-
मायकेल डोलन इलियानाला मिठी मारताना दिसत आहे, तिने फोटोला कॅप्शन दिले, “माझ्या स्टडमफिन आणि माझ्या पहिल्या व्हॅलेंटाईनला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.”
-
इलियाना आणि मायकेल फिनिक्स डोलन नावाच्या मुलाचे पालक आहेत, इलियानाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एका मुलाला जन्म दिला.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?