-
आत्तापर्यंत, खरे ठग आणि चोरांवर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज बनवण्यात आल्या आहेत, त्यापैकी काही आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतातल्या खऱ्या चोरांवर बनवलेल्या चित्रपट आणि वेब सीरिजची माहिती तुम्हाला येथे वाचायला मिळेल. (PC : Still from Film)
-
Jamtara
‘जामतारा’ ही वेबसिरीज झारखंडमधील प्रसिद्ध शहरावर आधारित असून, ज्याची कथा फोन कॉलद्वारे लोकांना फसवणाऱ्या तरुणांच्या समूहाभोवती फिरते. (PC : Still from Film) -
Dolly Ki Doli
‘डॉली की डोली’ हा चित्रपट चंदनमल सिरवी या चोराच्या जीवनावर आधारित आहे. (PC : Still from Film) -
Oye Lucky! Lucky Oye!
‘ओये लकी, लकी ओये’ हा चित्रपट बंटी नावाच्या चोरावर आधारित आहे. या चोराने देशभरात तब्बल ५०० हून अधिक मोठ्या चोऱ्या केल्या होत्या. (PC : Still from Film) -
Scam 1992
‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसिरीजमध्ये हर्षद मेहताची जीवनकथा दाखवण्यात आली आहे. शेअर मार्केटिंग आणि त्यानंतर झालेले घोटाळे हे या सिरीजमधून मांडण्यात आले आहेत. (PC : Still from Film) -
Scam 2003
‘स्कॅम 2003’ ही वेबसिरीज स्टॅम्प पेपर घोटाळेबाज अब्दुल करीम तेलगीच्या जीवनावर आधारित आहे. (PC : Still from Film) -
Special 26
‘स्पेशल 26’ हा चित्रपट ऐंशीच्या दशकात घडलेल्या फसवणुकीच्या काही घटनांवर आधारित आहे. काही ठग, आयटी अधिकारी बनून लोकांना, उद्योगपती आणि पुढाऱ्यांच्या घरावर छापेमारी करायचे. या ठगांच्या एका टोळीवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. (PC : Still from Film) -
Bad Boy Billionaires: India
‘Bad Boy Billionaires- India’ ही वेबसिरीज भारतातील ४ घोटाळेबाज अब्जाधीशांच्या जीवनावर आधारित आहे. यात फसवणूक, घोटाळे, लोकांचा विश्वासाघात आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक याच्या खऱ्या कहाण्या दाखवण्यात आल्या आहेत. (PC : Still from Film)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या