-
आपल्या सौंदर्य आणि हॉटनेससाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप लोकप्रिय असते.
-
तमन्ना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती दररोज वेगवेगळ्या शूटमधील फोटो पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते.
-
अलीकडेच, तमन्नाने इंस्टाग्रामवर हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील तमन्नाचं घायाळ करणारं रूप पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत.
-
तमन्ना भाटियाने स्टायलिश गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. यावेळी तिने हलका मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत.
-
अतिशय मादक पोजमध्ये तिने हे फोटोशूट केलं असून चाहते तमन्नाचं रूप पाहून घायाळ झाले आहेत.
-
तमन्नाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहत्यांनी यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान, तमन्ना ही भारतातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तमन्ना १८ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असून तिने सुमारे ६७ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
-
तमन्नाने २००६ मध्ये आलेल्या ‘श्री’ या तेलगू चित्रपटातून दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी ती ‘केडी’ या तमिळ चित्रपटातही दिसली.
-
कालांतराने तमन्नाला साऊथ सिनेमात लोकप्रियता मिळू लागली. काही काळानंतर ती तामिळ आणि तेलगू इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनली.
-
GQ च्या रिपोर्टनुसार तमन्नाची एकूण संपत्ती १२० कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी ती ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते.
-
बाहुबली २ या चित्रपटासाठी तिने ५ कोटी रुपये फी आकारली होती. त्याच वेळी, २०१८ च्या आयपीएलच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्यासाठी इणे ५० लाख रुपये आकारले होते.
-
तमन्ना भाटिया मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. जुहूच्या बेव्ह्यू अपार्टमेंटमध्ये तिचा अपार्टमेंट असून त्याची किंमत १६ कोटी रुपये आहे. (Photos: Tamannaah/Instagram)

सर्वपित्री अमावस्येला ग्रहांची स्थिती कोणत्या राशींसाठी ठरणार लाभदायक? वाचा मेष ते मीनचे रविवार विशेष राशिभविष्य