-
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे कार्तिकी गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाली.
-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणून तिला ओळखलं जातं.
-
सिनेविश्वातील अनेक प्रसिद्ध गाण्यांना कार्तिकीने आवाज दिला आहे.
-
वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली.
-
प्रेक्षकांची ही लाडकी गायिका आई होणार आहे.
-
कार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
-
ओटभरणी कार्यक्रमातील काही खास क्षण तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
नुकताच तिच्या डोहाळे जेवणाचा जंगी कार्यक्रम पार पडला.
-
कुणीतरी येणार येणार गं! असा संदेश लिहिलेली भव्य रांगोळी, कार्तिकीची नवऱ्यासह ग्रॅन्ड एन्ट्री व अन्य कुटुंबीयांची झलक या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
या फोटोंमध्ये कार्तिकीचे आई-वडील, सासू-सासरे व तिचे दोन भाऊ दिसत आहेत.
-
आपल्या जवळच्या कुटुंबीयांबरोबर तिने हा खास क्षण साजरा केला.
-
कार्तिकी व रोनितचं संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होतं.
-
डोहाळे जेवणात मुलगा की मुलगी होणार हा पारंपरिक खेळ खेळण्यात आला.
-
डोहाळे जेवणासाठी गायिकने खास लूक केला होता. हिरव्या रंगाच्या साडीवर तिने हलव्याचे व फुलांचे दागिने परिधान केले होते.
-
दरम्यान, सध्या मराठी कलाविश्वातून कार्तिकीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड इन्स्टाग्राम व @ aditya.image @ awphotography1020 )

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”