-
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने लंडनमध्ये होप गालाचे आयोजन केले होते. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू मुलांसाठी आर्थिक मदत उभारण्यासाठी तिने या कार्यक्रमात भाग घेतला.
-
या कार्यक्रमात आलियाने सांगितले की, “या मुलांच्या भविष्याला आकार देण्यासाठी एक छोटीशी भूमिका साकारताना मला आनंद होत आहे. आज आपल्या प्रयत्नांची सुरुवात आहे आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आपण येणाऱ्या पिढ्यांना सक्षम बनवण्यात लक्षणीय प्रगती करू असा मला विश्वास आहे.”
-
आलियाबरोबरच अभिनेत्री-मॉडेल पॉपी डेलेव्हिंग, दिग्दर्शक गुरिंदर चढ्ढा, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नताशा पूनावाला आणि इतर अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
-
भारतीय गायिका हर्षदीप कौरने या कार्यक्रमात परफॉर्म केले. आलियाने कॉमेडियन रोहन जोशीबरोबर मजेदार संवादही झाला.
-
आलिया म्हणाली, ‘सलाम बॉम्बे फाऊंडेशन आणि मँडरिन ओरिएंटल हॉटेल ग्रुपच्या सहकार्याने चॅरिटी कार्यक्रमाचे आयोजन करणे हा माझ्यासाठी खास अनुभव होता. भारतातील झोपडपट्ट्यांमधील तरुणांच्या उन्नतीसाठी आशा आणि संधी उपलब्ध करून देणाऱ्या पद्मिनी सेखसारिया यांच्या अतुलनीय समर्पणाची मी फार पूर्वीपासून प्रशंसा करत आले आहे.’
-
सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या संस्थापक आणि संचालिका पद्मिनी सेखसारिया म्हणाल्या, ‘या कार्यक्रमामधील आलियाचा सहभाग आशेचा किरण ठरला आहे. जमा झालेला निधी वंचित मुलांचे जीवन बदलण्यास आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कायमची सुधारण्यास मदत करेल.’
-
मंदारिन ओरिएंटलचे ग्रुप चीफ एक्झिक्युटिव्ह लॉरेंट क्लेटमन यांनी प्रतिक्रिया दिली, ‘आलिया भट्ट मंदारिन ओरिएंटलची खरी फॅन असल्याचा आम्हाला अभिमान आहे. निधी उभारण्यासाठी आज आम्ही तिच्याबरोबर आहोत याचा आम्हाला आनंद होत आहे.’
-
‘एवढ्या मोठ्या प्रमाणावर धर्मादाय कार्यक्रम आयोजित करणारी आलिया ही पहिली मंदारिन ओरिएंटल फॅन होस्ट आहे आणि या कार्यक्रमाचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिणाम आहे.’ ते पुढे म्हणाले.
-
दरम्यान आलियाने या कार्यक्रमासाठी परिधान केलेल्या पेहरावाने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले होते. यावेळी तिने पांढऱ्या रंगाची साडी आणि वाइन कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घातला होता.
-
गाऊनसोबतच आलियाने नीलम आणि हिऱ्यांनी जडलेला नेकलेसही घातला होता. या नेकलेसने आलिया भट्टचे सौंदर्य वाढलेच पण या नेकलेसच्या किमतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
-
या कार्यक्रमासाठी आलियाने खास बुलगारी ज्वेलरी ब्रँडमधील मॅचिंग नेकलेस आणि मॅचिंग सॅफायर रिंगची निवड केली होती.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या इटालियन ज्वेलरी लेबलच्या नेकलेस आणि रिंग्सची किंमत अंदाजे 20 कोटी रुपये आहे.

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल