-
सध्या मराठी वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
-
टीआरपीसाठी सुरू असलेल्या या स्पर्धेत वाहिन्या गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिकांच्या घोषणा करत आहेत.
-
‘स्टार प्रवाह’, ‘झी मराठी, ‘कलर्स मराठी’ या वाहिन्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत.
-
त्यामुळे सध्या नवनवीन मालिका येण्याचं सत्र सुरू आहे, असं म्हणायला काही हरकत आहे.
-
चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल-आठल्ये आणि महाराष्ट्राचे विनोदाचे बादशहा, अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव हे लवकरच एकत्र पाहायला मिळणार आहेत.
-
अलका कुबल-आठल्ये आणि भरत जाधव एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
-
‘कलर्स मराठी’ वाहिनीवर नवाकोरा विनोदी कार्यक्रम सुरू होतं आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’, असं या कार्यक्रमाचं नाव आहे.
-
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहेत.
-
या कार्यक्रमात भाऊ कदम व ओंकार भोजने व्यतिरिक्त सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण असे अनेक कलाकार झळकणार आहेत.
-
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ याच कार्यक्रमात अलका कुबल-आठल्ये व भरत जाधव यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.
-
अलका कुबल-आठल्ये व भरत जाधव हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत.
-
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा कार्यक्रम २० एप्रिलपासून शनिवार – रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. (All Photos-Social Media/ LS Graphic Design)

IND vs ENG: नशीब फुटकं राव! विकेट मिळाली पण बुमराहच्या एका चुकीमुळे मेहनतीवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं?