-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने महाराष्ट्रातच नाही तर दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
नुकतंच सोनालीने राखाडी साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या पेहरावात सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे. यावेळी तिच्या ब्लाऊजने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
राखाडी काठपदरी साडीवर सोनालीने गुलाबी रंगाचं ब्लाऊज घातलं आहे.
-
पण विशेष म्हणजे या ब्लाऊजवर सुंदर नक्षीदार आरीवर्क केलं आहे. सोनाली तिचं हेच नक्षीदार ब्लाऊज फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच सोनालीने एका लग्नसमारंभातील फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते.
-
हे फोटोही याच समारंभाशी संबंधित असल्याचे दिसते. तिच्या कपाळावर हळद-कुंकू लावल्याचे दिसते.
-
दरम्यान, यावेळी सोनालीने केस मोकळे सोडले असून गळ्यात पारंपरिक नेकलेसही घातला आहे. (Photo: @hr_tulve_brothers_photography/Instagram)

Russian Woman : घनदाट जंगलातील गुहेत आढळून आली रशियन महिला, दोन मुलींसह करत होती वास्तव्य; सांगितलं ‘हे’ कारण