-    अभिनेत्री अंकिता लोखंडे हे नाव सगळ्यांनाच परिचित आहे. टीव्ही सीरियल, सिनेमांतून तिने स्वतःची वेगळी ओळख मिळवली आहे. (सर्व फोटो सौजन्य-अंकिता लोखंडे, इंस्टाग्राम पेज) 
-    अंकिता लोखंडे ही तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तसंच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. 
-    बिग बॉस या रिअॅलिटी शोमधल्या सहभागामुळेही अंकिता लोखंडेची चांगलीच चर्चा झाली. तसंच अभिनेत्रा सुशांतची गर्लफ्रेंड अशीही तिची ओळख होती. 
-    सुशांत आणि अंकिताला लग्न करायचं होतं त्यामुळे अंकिताने संजय लीला भन्साळींचे चित्रपट सोडले होते. एका मुलाखतीत तिनेच ही बाब सांगितली. 
-    अंकिताने अनेक मोठ्या चित्रपटांसाठी ऑडिशन्सही दिल्या होत्या, पण नियतीने काहीतरी वेगळंच तिच्यासाठी ठरवलं होतं. 
-    संजय लीला भन्साळींनी अंकिताला चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा केली होती. मात्र तिने ही संधी दोनहून जास्तवेळा नाकारली. कारण तिला सुशांतशी लग्न करायचं होतं. 
-    चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी एका मुलाखतीत हे सांगितलं की रामलीला गोलियों की रासलीला हा चित्रपट सुरुवातीला अंकिताला ऑफर झाला होता. मुख्य भूमिकेसाठी तिला विचारण्यात आलं होतं. तिने ऑडिशनही दिली होती. पण सुशांतशी लग्न करायचं होतं म्हणून तिने चित्रपट केला नाही. 
-    स्वतः अंकिताने मुलाखतीत सांगितलं की संजय लीला भन्साळींनी तिला रामलीला, बाजीराव मस्तानी चित्रपटांसाठी विचारलं होतं. पण तिने चित्रपट नाकारले. तसंच हॅपी न्यू इयर चित्रपटासाठीही तिला विचारण्यात आलं होतं हा चित्रपटही तिने नाकारला. 
-    बाजीराव मस्तानीच्या काळात तर हा सिनेमा सोडू नकोस असाही फोन मला संजय सरांनी केला होता पण मी सिनेमा केला नाही कारण मला सुशांतशी लग्न करायचं होतं असंही अंकिताने सांगितलं आहे. 
 
  रात्री झोपताना ‘ही’ लक्षणं दिसली तर लिव्हर-किडनीचा धोका! पायावरील ‘अशा’ खुणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
  