-  
  बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या लग्नाला काल, २ मे रोजी ४४ वर्ष पूर्ण झाली.
 -  
  १९८०मध्ये हेमा मालिनी यांनी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली.
 -  
  सोशल मीडियावर हेमा मालिनी यांनी लग्नाच्या ४४ व्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.
 -  
  या फोटोंमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या गळ्यात चाफ्याच्या फुलांचा हार आहे.
 -  
  या फोटोवरून चाहत्यांमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी पुन्हा लग्नगाठ बांधली अशी चर्चा सुरू आहे.
 -  
  चाहत्यांनी हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना लग्नाच्या वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 -  
  हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलने ‘Happy Anniversary The Best Parents’ असे कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे.
 -  
  १९७०साली ‘तुम हसीन मैं जवान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट झाली होती.
 -  
  हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान फार मोठे आहे.
 -  
  लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी चक्क आपला धर्म बदलला.
 -  
  धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारत स्वतःचं नाव दिलावर खान असं ठेवलं.
 -  
  तर हेमा मालिनी यांनी स्वतःचं नाव बदलून आयशा बीआर चक्रवर्ती असे ठेवले.
 -  
  (सर्व फोटो सौजन्य : हेमा मालिनी/इन्स्टाग्राम)
 
  आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल