-
‘देवयानी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधून शिवानी तब्बल ९ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे.
-
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत ती ‘मानसी सणस’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
-
अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही.
-
वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलं.
-
आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटतं.
-
वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे.
-
आपल्या कॉलेजची टॉपर गायत्री मॅडमच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे.
-
पण आपल्या समोर कुणालाही जिंकू न देणाऱ्या गायत्रीच्या स्वार्थी स्वभावाची तिला कल्पना नाही.
-
खरी ठिणगी तेव्हा पडते जेव्हा मानसी पदवी परिक्षेत टॉप करत गायत्रीचा रेकॉर्ड मोडते.
-
मानसीला नाती जोडून ठेवायला आवडतात.
-
कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही.
-
नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं असं तिला वाटतं.
-
तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे.
-
स्टार प्रवाह कुटुंबाबरोबर पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे.
-
स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेसाठी मी लगेच होकार दिला.
-
मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं.
-
‘देवयानी’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. अश्या शब्दात शिवानीने आपली भावना व्यक्त केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह आणि शिवानी सुर्वे/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”