-
सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांची लव्हस्टोरी खूपच खास आहे. सनी आणि डॅनियलमध्ये खास बॉन्डिंग असून तिने अनेकवेळा मुलाखतींमध्ये तिच्या लग्नाची कहाणी सांगितली आहे.
-
13 मे 1981 रोजी कॅनडातील शीख पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या सनी लिओनीचे खरे नाव करनजीत कौर वोहरा होते.
-
कालांतराने सनी लिओनीने डॅनियल वेबरशी लग्न केले आणि सध्या ती त्याच्याबरोबर आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. आज सनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण डॅनियलसोबतची तिची प्रेमकहाणी कशी सुरू झाली ते पाहूया.
-
२०११ साली सनी लिओनी आणि डॅनियल वेबरने प्रेमविवाह केला. मात्र त्यांची पहिली भेट अतिशय विचित्र होती.
-
सनी लिओनीने एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा ती तिच्या जवळच्या मित्रासोबत लास वेगासमध्ये पार्टी करत होती तेव्हा ती पहिल्यांदा डॅनियलला भेटली.
-
यावेळी सनी तिला फसवणाऱ्या मित्राबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. याच ठिकाणी डॅनियल सनीला भेटला आणि त्यांची मैत्री झाली.
-
डॅनियल आणि सनीची मैत्री इतकी घट्ट झाली की डॅनियलने सनीचा व्यवसाय हाताळण्यास सुरुवात केली. जेव्हा सनीने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला त्यामध्येही डॅनियलने सनीला पूर्ण पाठिंबा दिला.
-
सनी लिओनीने अनेकदा खुलासा केला आहे की डॅनियलच्या आधी तिचे अनेक अफेअर होते. तिच्या म्हणण्यानुसार त्यापैकी एकही डॅनियलसारखा नव्हता.
-
सनी आणि डॅनियलने जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
सनी लिओनीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या आईचे निधन झाल्यानंतर डॅनियल तिच्या आयुष्यात आला.
-
यावेळी सनीने सांगितले की, ‘मी आईच्या खूप जवळ होते. आईच्या निधनानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले. तेव्हा डॅनियलने मला साथ दिली.’
-
सनीने पुढे सांगितले की, काही काळानंतर तिच्या वडिलांचेही निधन झाले, तरीही डॅनियल कायम तिच्याबरोबर राहिला. याचवेळी तिने डॅनियलला तिचा जोडीदार म्हणून स्वीकारले.
-
त्याचबरोबर डॅनियलने एका मुलाखतीत सांगितले की, ‘जेव्हा सनी माझ्या आयुष्यात आली तेव्हा कुटुंब म्हणजे काय, कुटुंब असणे म्हणजे काय हे मी शिकलो. तिने मला देवावर विश्वास ठेवायला शिकवले.’
-
खूप विचार करून सनी आणि डॅनियलने लग्नाचा निर्णय घेतला. २० जानेवारी २०११ रोजी सनी आणि डॅनियलचे लग्न झाले आणि काही वर्षांनी ते कायमचे भारतात शिफ्ट झाले. तथापि, त्याची कॅनडा आणि कॅलिफोर्नियामध्येही घरे आहेत जिथे ते सहकुटुंब फिरायला जातात.
-
डॅनियल आणि सनीने २०१७ मध्ये एका मुलीला दत्तक घेतले, तिचे नाव निशा कौर वेबर आहे. सरोगेसीमधून सनी आणि डॅनियल यांना आशार सिंग वेबर आणि नोहा सिंग वेबर हे दोन मुलगे आहेत. सनी आणि डॅनियल सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. (Sunny Leone/Instagram)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?