-
‘दहाड’ या वेबसिरीजमध्ये विजय वर्माने नकारात्मक भूमिका साकारली होती. या वेबसिरीजमधील ‘आनंद स्वर्णकार’ नावाची त्याची भूमिका आणि त्याची व्यक्तिरेखा ही चाहत्यांना खूप आवडली होती. -
बॉबी देओलने ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. या वेबसिरीजमध्ये तो ‘बाबा निराला’च्या भूमिकेत दिसला होता. -
नवाजुद्दीन सिद्दीकीने नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. या मालिकेत तो ‘गणेश गायतोंडे’च्या भूमिकेत दिसला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवाजुद्दीन सिद्दीकीची ही वेबसिरीज सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी ठरली होती. -
‘पाताल लोक’ या वेबसिरीजमध्ये अभिषेक बॅनर्जीने नकारात्मक भूमिका साकारली होती. या मालिकेत तो ‘हाथोडा त्यागी’च्या भूमिकेत दिसला होता.
-
दिव्येंदू शर्माने ‘मिर्झापूर’ या क्राईम सीरिजमध्ये खलनायकची भूमिका साकारली होती. या मालिकेत तो ‘मुन्ना त्रिपाठी’च्या भूमिका साकारताना दिसला होता.
-
साऊथ अभिनेत्री समंथाने ‘द फॅमिली मॅन सीझन २’ या वेबसीरिजमध्ये तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. या मालिकेत ती ‘राझी’ या व्यक्तिरेखेत दिसली होती.
-
विशेष बन्सलने ‘असुर’ या वेबसिरीजमध्ये ‘सुभाष जोशी’ची भूमिका साकारली होती. त्याच्या या खलनायकाच्या भूमिकेमुळे त्याने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली.

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case