-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
मात्र सध्या सारा वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत असून हे कारणही तितकेच खास आहे.
-
सचिन आणि अंजली तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर मेडिसिनमध्ये मास्टर बनली आहे.
-
सारा युनिवर्सिटी कॉलेज लंडनमधून पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्रावीण्यासह सारा तेंडुलकर उत्तीर्ण झाली आहे.
-
यासंबंधीचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्युट्रीशन’ या विषयात साराने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
-
या बातमीनंतर सचिनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
-
यासंबंधीचा एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने आपल्या लेकीला कौतुकाची थाप दिली आहे.
-
त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी तू वर्षानुवर्षे मेहनत केली आहेस. हे इतके सोपे नव्हते. तुझे पालक म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. मला खात्री आहे की तू तुझी सर्व स्वप्न पूर्ण करशील.”

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”