-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. यामध्ये राजकुमार रावही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (@ janhvikapoor /Insta)
-
जान्हवी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकताच तिने खुलासा केला आहे की रात्री तिचे आई-वडील झोपल्यानंतर ती लपून त्यांच्या खोलीत जात असे.
-
जान्हवी कपूर तिचे आई-वडील श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्याबद्दल खूप काळजीत असायची. त्यामुळे ती त्यांच्या खोलीत जायची आणि ते दोघेही ठीक आहे का? ते बघायची.
-
अभिनेत्रीने रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. ते दोघे जिवंत आहेत ना, हे बघायला त्यांच्या खोलीत जायचे, असं जान्हवीने सांगितलं.
-
जान्हवी कपूर म्हणाली की, ती लहान होती तेव्हा तिला भीती वाटत होती की ती आई-वडील गमावेल. मोठी झाल्यावरही तिला हीच भीती असायची.
-
त्यामुळे दोघांचाही श्वास सुरू आहे ना, हे बघायला ती अनेकदा रात्री त्यांच्या खोलीत जात असे.
-
आई श्रीदेवींचं जाणं अद्याप स्वीकारू शकले नाही, असं जान्हवीने या मुलाखतीत सांगितलं.
-
जान्हवी कपूर म्हणाली, एका विशिष्ट वयानंतर आई-वडील तुमची मुलं बनतात आणि तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागते.
-
(सर्व फोटो – जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस