-    प्रतीक बब्बरने नुकतीच Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. 
-    या कार्यक्रमात त्यांची दिवंगत आई आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांचा ‘मंथन’ हा चित्रपट दाखवण्यात आला . 
-    या सोहळ्यात प्रतीक बब्बर पँट सूट घालून दिसला होता. 
-    आता अभिनेत्याच्या या सूटबद्दल एक खास अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे चाहते खूप खूश आहेत. 
-    प्रतीक बब्बर त्याची दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या साडीपासून बनवलेला सूट परिधान करून कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचला. 
-    प्रतीकचा हा सूट स्मिता पाटील यांच्या कांजीवराम साडीपासून बनवला होता. 
-    याचा खुलासा प्रतीकचा डिझायनर राहुल विजयने केला आहे. 
-    अभिनेत्याचे फोटो शेअर करत राहुलने कॅप्शनमध्ये लिहिलं, “प्रतीक मला तुझी दिवंगत आई आणि अत्यंत आदरणीय स्मिता पाटील यांच्या जपून ठेवलेल्या गोष्टी वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.” 
-    जेव्हा प्रतीकने मला फोन केला आणि मला स्मिता पाटील यांच्या ‘मंथन’ चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी ड्रेस तयार करण्यास सांगितलं, तेव्हा मला वाटलं की त्याच्या लूकमध्ये स्मिता पाटील यांची आठवण असायला हवी. – राहुल विजय 
-    आता हे आव्हानात्मक होतं, कारण त्यांच्या कपाटातून आम्हाला फक्त महिलांचे कपडे सापडत होते आणि त्याशिवाय स्मिता पाटील यांच्या वॉर्डरोबमधून आम्हाला काय मिळेल हे माहीत नव्हतं.- राहुल विजय 
-    मग आम्हाला त्यांच्या आठ साड्या मिळाल्या. – राहुल विजय 
-    आम्ही त्यातील दोन सुंदर सिल्क कांजीवराम साड्यांवर लक्ष केंद्रित केलं. एक गडद मरून व काळ्या रंगाची व दुसरी साधी काळी सिल्क साडी होती.- राहुल विजय 
-    या सांभाळून जपून ठेवलेल्या साड्या होत्या. – राहुल विजय 
-    त्यानंतर मी प्रतीकच्या स्टाइलला सूट होणारा व स्मिताजींच्या साडींना न्याय देणारा ड्रेस डिझाइन केला, हे खूप आव्हानात्मक होतं, असं राहुल विजय म्हणाला. 
-    (सर्व फोटो – राहुल विजय इन्स्टाग्राम) 
 
  PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  