-
अभिनेत्री पूजा सावंत लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या माहेरच्या गावी पोहोचली आहे.
-
पूजा सावंतचं गाव कोकणात आहे.
-
कोकणातील सुंदर फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या घराची व कोकणातील निसर्गरम्य वातावरणाची झलक पाहायला मिळत आहे.
-
यावेळी तिच्याबरोबर तिचा भाऊ श्रेयस, बहीण रुचिरा आणि तिचे वडील देखील कोकण फिरायला गेले आहेत.
-
पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं कोकणातील घर, आजूबाजूचा परिसर आणि हिरव्यागार आमराईची झलक पाहायला मिळत आहे.
-
पूजाच्या घरासमोर माड व आंब्याच्या कलमांची नव्याने लागवड करण्यात आली आहे.
-
पूजाने गावचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याला “कोकणची चेडवा हो नाखवा…” हे गाणं जोडलं आहे.
-
दरम्यान, पूजाच्या कोकणातील फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम )

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक