-
मंडळी साऊथचा हाय बजेट आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोण यांच्यासह इतरही अनेक मोठे स्टार्स या चित्रपटाचा भाग आहेत, ज्यांच्या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. (@Prabhas /FB)
-
या चित्रपटात अनेक मोठे स्टार कॅमिओ करताना दिसले, ज्यात विजय देवरकोंडा ते एसएस राजामौली यांच्या नावांचा समावेश आहे. जाणून घेऊया या चित्रपटात कोणते मोठे स्टार कॅमिओ करताना दिसत आहेत. (@Prabhas /FB)
-
‘कल्की 2898 एडी’ मधील विजय देवरकोंडाचा कॅमिओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अर्जुन या पात्राचा त्याचा कॅमिओ आहे. (@DVS_FAN/twitter)
-
त्याचवेळी दुलकर सलमानही कॅमिओ करताना दिसला. या चित्रपटात तो प्रभासच्या (भैरवा या पात्राच्या) संरक्षकाच्या भूमिकेत आहे. (@Sebastian_GMS/twitter)
-
अनेक साऊथ चित्रपटांत काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आणि महाराष्ट्रात जन्मलेल्या मृणाल ठाकूरचाही कॅमिओ या चित्रपटात आहे. यामध्ये ती दिव्याच्या भूमिकेत आहे. (@Mrunal Thakur/FB)
-
दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते एस.एस. राजामौली यांची कॅमिओ भूमिका एका शिकाऱ्याची आहे. या व्यक्तिरेखेला भैरव म्हणजेच प्रभासचा प्रतिस्पर्धी म्हणून दाखवले आहे. (@SSRajamouli/FB)
-
या दिग्गज कलाकारांसह या चित्रपटात राम गोपाल वर्मा यांचाही एक कॅमिओ आहे. तसेच केव्ही अनुदीप, श्रीनिवास अवसरला आणि अभिनेत्री फारिया अब्दुल्ला देखील कॅमिओ करताना दिसत आहेत. हेदेखील पाहा- PHOTOS : पंतप्रधानांना भेटल्या दोन छोट्या पाहुण्या, ऐकवली कविता; मोदी म्हणाले ‘वाह’! (@RGV/FB)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL