-
राजकुमार राव, अलाया एफ, आणि ज्योतिका यांच्या भूमिका असलेला ‘श्रीकांत’ चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता. दृष्टीहीन श्रीकांत बोल्लांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
-
दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांचा चित्रपट अखेर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर राजकुमार रावच्या श्रीकांत चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टनुसार, सिनेमा ५ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
-
‘श्रीकांत’ हा नेत्रहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक ३२ वर्षीय श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी निर्मित, हा चित्रपट १० मे २०१४ रोजी देशभरात प्रदर्शित झाला.
-
श्रीकांत हे व्यावसायिक आणि बोलंट इंडस्ट्रीजचे मालक आहेत. इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा होता, परंतु ते अंध असल्यामुळे आयआयटीने त्यांना प्रवेश नाकारला. या नकाराने न खचता त्यांनी शिक्षण व्यवस्थेविरुद्ध खटला दाखल केला आणि सहा महिन्यांत खटला जिंकला आणि त्यानंतर पुढील शिक्षण घेतलं. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकून भारतात परतल्यावर त्यांनी हैदराबादमध्ये बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना केली. या कंपनीत फक्त दिव्यांग काम करतात. त्यांच्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू ५०० कोटी रुपये आहे.
-
राजकुमार राव शेवटचा मिस्टर अँड मिसेस माहीमध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूरही दिसली होती. या दोघांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या विवाहित जोडप्याची भूमिका साकारली आणि अभिनेत्रीने क्रिकेटरची भूमिका साकारली. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळाली.
-
तसेच, स्त्री २ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यात राजकुमार रावशिवाय या चित्रपटात श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्