-
अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी अनेक मराठी व हिंदी गाजलेल्या मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
सध्या नीना स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत काम करत आहेत.
-
‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी आहे.
-
या मालिकेत नीना यांचाबरोबर विशाल निकम, जय दुधाणे, पूजा बिरारी, अतिशा नाईक, उमेश नाईक, अभय राणे अशी दिग्गज कलाकार मंडळी आहेत.
-
नीना यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
हिरव्या साडीतील लूकवर नीना यांनी मराठमोळ्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
वयाच्या ६८ व्या वर्षी नीना यांचं साडीतील मनमोहक सौंदर्य अनेकांना लाजवणारे आहे.
-
नीना यांच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नीना कुळकर्णी/इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल