-
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी यश मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात.
-
कोणी आधी उजव्या पायात शूज घालतो आणि नंतर डावीकडे, तर कोणी कोणत्याही कामावर चर्चा करण्याचे टाळतात. आज आपण अशाच काही कलाकारांबाबत जाणून घेऊया जे अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि त्यांचे पालन करतात.
-
अनुपम खेर यांनी सांगितले की सुरुवातीला त्यांना विमानाने प्रवास करताना भीती वाटायची. पण कामामुळे त्यांना प्रवास करावा लागायचा.
-
ते असे म्हणतात की निळ्या जीन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये ते स्वतःला शांत ठेवू शकतात आणि त्यांच्या भीतीवर नियंत्रण मिळवू शकतात. म्हणूनच ते गेल्या २९ वर्षांपासून फ्लाइट दरम्यान फक्त पांढरा शर्ट आणि निळी जीन्स घालतात.
-
अभिनेत्री रिमी सेनही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते. ती तिच्या प्रोजेक्ट्सबद्दल वेळेआधी कोणालाही सांगत नाही. रिमी म्हणते, ‘मी जर एखाद्या गोष्टीबद्दल वेळेआधी बोलले, तर ती गोष्ट घडणार नाही.’
-
शाहीद कपूरने सांगितले की, तो शालेय जीवनापासूनच अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो. शाहिद म्हणतो, ‘मी नेहमी उजवा बूट आधी घालतो आणि नंतर डावा’. शाहिद शाळेच्या काळापासून ही गोष्टी करत आहे.
-
शिल्पा शेट्टीचा फेंगशुईवर विश्वास आहे. फेंगशुईनुसारच तिने तिच्या घराचे नूतनीकरण केले होते. याशिवाय शिल्पा काही गोष्टींबद्दल अगोदर बोलणेही टाळते. असे केल्यास कोणाची तरी वाईट नजर पडू शकते, असे तिला वाटते.
-
या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या नावाचाही समावेश आहे. पती अभिषेक बच्चनच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी ऐश्वर्याने फेंगशुई मास्टर चारुहास नाईक यांची मदत घेतली होती. त्यांच्या सांगण्यावरून ऐश्वर्याने अभिषेकची व्हॅनिटी व्हॅन नवीन पद्धतीने तयार केली होती.
-
प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचाही अशा गोष्टींवर विश्वास आहे. ते त्यांच्या चित्रपटांची नावे फक्त ‘के’ या अक्षराने ठेवतात.
-
टीव्ही क्वीन एकता कपूरचा अशा गोष्टींवर खूप विश्वास आहे. तिच्या जवळच्या स्त्रोतावर विश्वास ठेवला तर, एकता कोणताही नवीन शो सुरू करण्यापूर्वी तिच्या मुख्य कलाकारांच्या जन्मकुंडलीची तुलना करते. तसेच ती बुधवारी कोणताही नवीन शो सुरू करत नाही. (All Photos Official Instagram Accounts)
-
येथे देण्यात आलेली माहिती विविध मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल