-
नीतू कपूर यांनी वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. नीतू कपूर आज आपला ६६ वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्यांच्या संबंधित काही किस्से.
-
नीतू कपूरचा जन्म दिल्लीतील शीख कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव हरनीत कौर आहे. पुढे त्यांचे आई-वडील मुंबईला शिफ्ट झाले. मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
-
जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी नीतू कपूर खूप लहान होत्या. अशा परिस्थितीत वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
-
नीतू कपूर यांचा बाल कलाकार म्हणून पहिला चित्रपट ‘सूरज’ होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक टी प्रकाश राव होते. नीतू कपूर यांना त्यांचे नाव अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी सुचवले होते. वैजयंतीमाला यांनीच नीतू कपूरला बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळवून दिली.
-
‘सूरज’ नंतर नीतू कपूर यांनी ‘दस लाख’ चित्रपटात काम केले पण त्यांना खरी ओळख ‘दो कलियां’मधून मिळाली. या चित्रपटातील त्यांची दुहेरी भूमिका लोकांना खूप आवडली. चित्रपटातील ‘बच्चे मन के सच्चे’ हे गाणं त्यावेळी सुपरहिट झालं.
-
पुढे १९७३ मध्ये त्यांना ‘रिक्षावाला’ चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून ब्रेक मिळाला. या चित्रपटात रणधीर कपूर देखील होते. हा चित्रपट जरी फ्लॉप झाला पण नीतू कपूर यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता.
-
नीतू कपूर यांनी यानंतर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कामं केलं.
-
नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते १९८० मध्ये लग्न बंधनात अडकले.
-
लग्नानंतर नीतू कपूर या फिल्म इंडस्ट्रीपासून दूर झाल्या आणि तब्बल २५ वर्षानंतर त्यांनी २००७ मध्ये आलेल्या ‘लव आज कल’ या चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन केले होते.

१२ महिन्यांनंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या नशिबी पैसाच पैसा! दशांक योगामुळे धन-धान्याची वाढ तर मिळेल मोठं यश