-
श्रुती मराठे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
मात्र, श्रुती केवळ अभिनयासाठीच नाही तर तिने निर्मिती केलेल्या मालिकांसाठीही ओळखली जाते.
-
श्रुती मराठे व तिचा पती, अभिनेता गौरव घाटणेकर यांची निर्मिती असलेली ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली.
-
एवढंच नव्हे तर श्रुती मराठेच्या या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाला होता.
-
श्रुतीच्या नव्या मालिकेचं नाव ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ असं आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर ही नवीन मालिका १० जूनपासून सुरू झाली आहे.
-
मालिकांबरोबर श्रुती सध्या तिच्या लक्षवेधी फोटोशूटमुळेही चर्चेत आहे.
-
श्रुतीचे वेगवेगळ्या लूक्समधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
नुकतंच श्रुतीने नव्या पेहरावतील फोटो पोस्ट केले आहेत.
-
यावेळी श्रुतीने पांढऱ्या रंगाचा वन-शोल्डर टॉप आणि स्कर्ट घातला होता.
-
श्रुतीने वेणीमध्ये तर गजरा माळलाच होता पण त्याचबरोबर तिने हातातही गजरा बांधला होता.
-
श्रुतीचा हा अनोखा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहे.
-
एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे, “मला नाही आवडला तुझा हा लूक. तु साधी खूप छान दिसतेस, नको असं करत जाऊस.” (फोटोग्राफी : @bharatpawarphotography)

राज्यात २४ ते ३१ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज; ‘या’ भागात पडणार सर्वाधिक पाऊस