-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टार्सनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये कामं केले आहे. तसेच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी बरीच प्रशंसा मिळवली आहे. पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी ‘ॲनिमल’पासून ‘बजरंगी भाईजान’पर्यंत अनेक मोठे चित्रपटांना नाकारले आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘बजरंगी भाईजान’च्या निर्मात्यांना चित्रपटासाठी अगोदर दाक्षिणात्य स्टार पुनीत राजकुमारला कास्ट करायचे होते.
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक नयनताराने शाहरुख खानच्या २०२३ मध्ये आलेल्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण याआधी अभिनेत्रीला शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ची ऑफर आली होती जी तिने नाकारली होती.
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक महेश बाबू यांनी बॉलिवूडचे अनेक चित्रपट नाकारले आहेत. २०२३ मध्ये रणबीर कपूरच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ॲनिमल’साठी महेश बाबू निर्मात्यांची पहिली पसंती होते. मात्र अभिनेत्याच्या नकारानंतर ‘ॲनिमल’साठी रणबीरला कास्ट करण्यात आलं.
-
मीडिया रिपोर्ट्सवर, दाक्षिणात्य मेगास्टार अल्लू अर्जुनलाही ‘बजरंगी भाईजान’ ऑफर करण्यात आला होता पण काही कारणास्तव त्याने या चित्रपटासाठी नकार दिला.
-
या यादीत ‘केजीएफ’ फेम अभिनेता यशच्या नावाचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशला ‘लाल कप्तान’ या बॉलीवूड चित्रपटाची ऑफर आली होती जी त्याने नाकारली होती. त्याच्या नकारानंतर या चित्रपटात सैफ अली खानला कास्ट करण्यात आले. मात्र २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
-
कन्नड अभिनेता दर्शननेही बॉलिवूड चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला सलमान खानच्या ‘दबंग ३’ चित्रपटात खलनायकाची भूमिका ऑफर करण्यात आली होती.
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील स्टार कलाकारांपैकी एक असलेल्या फहद फासिलनेही अनेक बॉलिवूड चित्रपट नाकारले आहेत. अभिनेता लवकरच ‘पुष्पा २’ मध्ये दिसणार आहे.
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रश्मिका मंदान्नाला शाहिद कपूर सोबत ‘जर्सी’ चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, जी तिने नाकारली होती.
-
साउथ अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या ‘बाहुबली’ चित्रपटातील अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. त्याच दरम्यान अभिनेत्रीने रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ चित्रपट नाकारला होता. याशिवाय अनुष्काने बॉलिवूडचे अनेक चित्रपटही नाकारले आहेत.

अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात…