-
साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार कलाकारांपैकी एक असलेlल्या धनुषचा काल ४१ वा वाढदिवस साजरा झाला. त्याचा ‘रायन’ हा चित्रपट दोन दिवसांपूर्वी २६ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता, जो सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. (धनुष/एफबी)
-
धनुष खूप विलासी जीवन जगतो. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. इतकच नाही तर अभिनेत्याकडे अनेक आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया: (धनुष/एफबी)
-
रायन हा धनुषचा ५० वा चित्रपट आहे आणि त्याने फक्त दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर २७ कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक स्वतः धनुष आहे. (धनुष/एफबी)
-
धनुषने २००२ मध्ये आलेल्या ‘थुल्लूवधो इलामाई’ या चित्रपटातून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. २२ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत, अभिनेत्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज धनुष साऊथ इंडस्ट्रीतील श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. (धनुष/एफबी)
-
धनुष हा साऊथ सिनेमा जगतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. एका चित्रपटासाठी कलाकार सुमारे २० ते ३५ कोटी रुपये मानधन घेतो. (धनुष/एफबी)
-
धनुषने २००४ मध्ये साऊथ सिनेसृष्टीतील मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केले, मात्र १४ वर्षांनी २०२२ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. धनुष आणि ऐश्वर्या हे दोन मुलांचे पालक आहेत. (धनुष/एफबी)
-
जीक्यू इंडियाच्या मते, धनुष सुमारे २३० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तो करोडो रुपये कमावतो. एका ब्रँडसाठी तो सुमारे ३ कोटी रुपये घेतो. (धनुष/एफबी)
-
धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी २०१० मध्ये वंडरबार फिल्म्स नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. या प्रोडक्शन हाऊसमध्ये अनेक मोठे चित्रपट बनले आहेत. इथूनही ते करोडोंची कमाई करतात. (धनुष/एफबी)
-
धनुष हा महादेवाचा खूप मोठा भक्त आहे. त्याने दोन्ही मुलांची नावेही (लिंगा) महादेवाच्या नावावर ठेवली आहेत. (धनुष/एफबी)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार धनुषचा चेन्नईमध्ये एक आलिशान बंगला आहे ज्याची किंमत सुमारे १५० कोटी रुपये आहे. याशिवाय चेन्नईमध्ये आणखी एक घर आहे ज्याची किंमत १८ कोटी रुपये आहे. (धनुष/एफबी)
-
कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर धनुषकडे बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पर, रोल्स रॉयस घोस्ट, ऑडी ए8, फोर्ड मस्टँग जीटी आणि जॅग्वार एक्सई सारख्या अनेक लक्झरी कार आहेत. (इंडियन एक्सप्रेस)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”