-
दर महिन्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत असतात. ऑगस्ट महिन्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. जाणून घ्या याबद्दल. -
कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकर आता निर्माते हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर ९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
-
विक्रांत मॅसी आणि तापसी पन्नू यांचा ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट २०२१ मध्ये आलेल्या हसीन दिलरुबा चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
कमल हसन, मामूट्टी, मोहनलाल आणि फहद फासिल यांची वेब सीरिज ‘मनोर्थंगल’ १५ ऑगस्ट रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.
-
टीव्ही होस्ट, डान्सर आणि अभिनेता राघव जुयाल ‘ग्यारह-ग्यारह’ ही वेब सीरिज लवकरच प्प्रेक्षकांच्या भेटलीला येणार आहे. या मालिकेत राघवसोबत अभिनेत्री कृतिका कामरा आणि धैर्य करवा हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सिरीज ९ ऑगस्ट रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.
-
संजय दत्त आणि रवीना टंडन यांचा ‘घुडचडी’ चित्रपट ९ ऑगस्ट रोजी जिया सिनेमाजवर प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात खुशाली कुमार, पार्थ समथान आणि अरुणा इराणी हे ही मुख्य भूमिकेत आहेत.
-
दिव्यांदू शर्मा आणि कुशा कपिला यांची वेब सीरीज ‘लाईफ हिल गया’ ही ९ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
-
राघव जुयाल, लक्ष्य आणि तान्या माणिकतला यांची ‘किल’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत? ‘हा’ स्वस्त आणि सोपा जुगाड करुन पाहा, जाडजूड कपडेही वाळतील लवकर, पाहा VIDEO