-
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद आज त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनू सूद अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याने आपल्या अभिनयासह लॉकडाऊनच्या काळात लोकांची मदत करूनही त्यांची मने जिंकली आहेत.
-
सोनू सूदचा हा साधेपणा लोकांना खूप आवडतो, मात्र त्याच्या पत्नी सोनाली सूदसोबतही असेच काहीसे घडते. सोनू सूदची पत्नी सोनाली बॉलिवूडपासून दूर राहते आणि अगदी साधं आयुष्य जगते.
-
सोनू सूदची लव्ह लाईफही खूप छान आणि फिल्मी आहे. कॉलेजच्या प्रेमाला त्यांनी आयुष्यभरासाठी सोबती बनवले. सोनू आणि सोनाली नागपुरात त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेज दरम्यान भेटले होते.
-
पडद्यावर खलनायकाची भूमिका करून लोकांना घाबरवणारा सोनू पहिल्याच नजरेत सोनालीच्या प्रेमात पडला. इंजिनीअरिंगच्या अभ्यासादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले.
-
२५ सप्टेंबर १९९६ रोजी सोनू आणि सोनाली लग्नबंधनात अडकले. तेव्हा सोनू सूद केवळ २१ वर्षांचा होता आणि त्यावेळी त्याने चित्रपटसृष्टीत येण्याचा कोणताही विचार केला नव्हता.
-
सोनालीशी लग्न केल्यानंतर सुमारे ३ वर्षांनी सोनीने अभिनयाच्या जगात येण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या भावना सोनालीला सांगितल्यावर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.
-
मात्र, जेव्हा सोनू सिनेमाच्या दुनियेत स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होता, तेव्हा सोनालीने त्याला प्रत्येक पावलावर साथ दिली. ती सोनूसोबत मुंबईत एका खोलीमध्ये राहत होती आणि प्रत्येक कठीण प्रसंगी त्याच्या पाठीशी उभी राहिली.
-
सोनू सूदला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याने परिश्रमाच्या जोरावर बॉलीवूड इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान मिळवले. सोनूने ९९९ मध्ये ‘कल्लाझागर’ या तमिळ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचवेळी त्याने २००२ मध्ये ‘शहीद-ए-आझम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
-
सोनूच्या पत्नी सोनालीबद्दल बोलायचे झाले तर तिला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. मात्र, सोनाली एक यशस्वी निर्माती देखील आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुतक तुतक तुतिया’ या बॉलिवूड चित्रपटात सोनालीने सहनिर्माता म्हणून काम केले आहे.
-
सोनू आणि सोनालीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर या जोडप्याला दोन मुलं देखील आहेत. अयान आणि इशांत अशी त्याच्या दोन मुलांची नावे आहेत. सोनू सूदची ही दोन्ही मुलंही लाइमलाइटपासून दूर राहतात.

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल