-
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेली काजोलने १९९२ मध्ये ‘बेखुदी’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
काजोल आणि अजय देवगणच्या नावाचा समावेश बॉलिवूडच्या बेस्ट कपलमध्ये होतो. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, एकेकाळी अजय देवगण काजोलवर चिडला होता.
-
काजोल आणि अजय देवगण यांची पहिली भेट १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या दोघांचाही एकत्र हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात आधी अभिनेत्री दिव्या भारती होती पण नंतर चित्रपटात काजोलला कास्ट करण्यात आले.
-
अजय देवगण आणि काजोलचा स्वभाव अगदी वेगळा होता हलचुलच्या सेटवर दोघेही एकमेकांना भेटले तेव्हा अजय देवगणला काजोल अजिबात आवडली नाही पुढे अजय देवगणने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, काजोल सेटवर खूप मोठ्याने बोलायची.
-
काजोल चित्रपटाच्या सेटवर नेहमी ओरडायची आणि मोठ्याने बोलायची आणि अजयला ते अजिबात आवडत नसे. यानंतर अजय देवगणने ठरवले होते की तो कोजलला पुन्हा भेटणार नाही.
-
हलचुल चित्रपटाच्या सेटवर जेव्हा दोघेही पहिल्यांदा भेटले होते, तेव्हा ते दोघे दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होते.
-
काजोलने ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती अजय देवगणला भेटली तेव्हा ती दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होती आणि अजयही दुसऱ्या दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता.
-
काजोल आणि अजय देवगणने त्यांच्या डेब्यू चित्रपट ‘हलचल’च्या सेटवर बराच वेळ घालवला. यानंतर दोघेही बोलू लागले आणि खूप चांगले मित्र बनले. काजोलने पुढे सांगितले की, याच काळात त्यांचे अचानक ब्रेकअप झाले होते आणि यामुळे यानंतर त्यांचे नाते मैत्रीपेक्षा अधिक घट्ट झाले.
-
अजय देवगण आणि काजोलने लग्नाआधी जवळपास ४ वर्ष एकमेकांना डेट करत होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक लोक त्यांच्या विरोधात होते. काजोल आणि अजयचा स्वभाव वेगळा असून हे लग्न फार काळ टिकणार नाही, असा अनेकांचा समज होता. पण आज हे दोन्ही स्टार्स फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक आहेत.

“मोठी किंमत मोजावी लागेल, पण…”, ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर