-
सनी देओलने आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर-२’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने जवळपास ६४० कोटींचे कलेक्शन केले.
-
पडद्यावर सनी देओल नेहमी ॲक्शन चित्रपट करताना दिसला. प्रत्येक व्यक्तिरेखेत प्रेक्षकांनी त्याला खूप पसंती दिली पण एकदा सनी देओलने डान्स सीन शूट करण्यासाठी संपूर्ण सेट रिकामा केला होता.
-
सुरूवातीपासूनच सनी देओल फक्त एकाच गोष्टीत अडचण येते आणि ते म्हणजे नृत्य. सनी देओल बॉलीवूडमधील इतर अभिनेत्यांसारखा चांगला डान्सर नाही हे कोणापासून लपून राहिलेले नाही. अनेकदा तो स्वत: चित्रपटांमध्ये नृत्य करणे टाळतो.
-
१९९६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जीत’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात सनी देओलसोबत सलमान खान आणि करिश्मा कपूरही मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील ‘यारा ओ यारा’ एक गाणं होतं ज्यात सनी देओल नाचला होता. पण तो नाचताना नर्व्हस झाला होता. खूप सराव करूनही तो नीट डान्स करू शकणार नाही असे अभिनेत्याला वाटले.
-
सनी देओल इतका घाबरला की त्याने दिग्दर्शकासमोर एक अट ठेवली. अशी अट घालण्यात आली होती की, कोरिओग्राफर आणि कॅमेरामन वगळता सेटवरील बाकीच्या सर्वांना काढून टाकावे. सनी देओलला भीती होती की लोक त्याच्या डान्सवर हसतील.
-
दिग्दर्शकाने सनी देओलला होकार दिला आणि सेट रिकामा केला. यानंतर हे गाणे चित्रीत झाले. हे गाणे शूट करताना त्याने अनेक रिटेकही दिले. मात्र, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोकांना हे गाणं खूप आवडलं.
-
लोकांना केवळ गाणंच नाही तर सनी देओलने केलेले डान्स स्टेप्सही आवडले होते.
-
सनी देओलच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो ‘बॉर्डर-२’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. ‘गदर-२’साठी सनी देओलने १५ कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

“मी मुस्लीम आहे त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया; म्हणाला, “कुराणमध्ये…”