-
अभिनेत्री जान्हवी कपूरने अलीकडेच एका कार्यक्रमात आकर्षक लाल साडी नेसून हजेरी लावली.
-
जान्हवीचे साड्यांबद्दलचे प्रेम जगजाहीर आहे. अनेकदा ती वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी साडीची निवड करताना दिसून येते.
-
मनीष मल्होत्रा हा जान्हवीच्या आवडत्या डिझायनरपैकी एक आहे. मात्र, यावेळी तिने तोराणी या ब्रँडची साडी नेसली होती.
-
‘सरोजा रमणी साडी’ नावाची साडी डिझायनरच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे.
-
हाताने मोत्याचे भरतकाम केलेल्या या साडीमध्ये जरीचे किचकट काम केलेले आहे. ऑर्गन्झा फॅब्रिकमधील ही साडी एखाद्या हेरिटेज कलाकृतीप्रमाणे डिझाइन करण्यात आली आहे.
-
बाल्डा लेस असलेली स्टेटमेंट बॉर्डर या साडीचे सौंदर्य आणखीनच वाढवत आहे. इतकंच नाही तर जान्हवीनेही तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतलेली दिसतेय.
-
लाल रंगाच्या साडीच्या अगदी विरूद्ध असलेल्या ब्लाउजला डिझायनरच्या वेबसाइटवर ‘मयुरी रमाणी ब्लाउज’ असे नाव देण्यात आले आहे. हे ब्लाऊज बटरफ्लाय नेट फॅब्रिकचे बनलेले आहे आणि त्यात मोती आणि डबका वर्कसह हाताने भरतकाम केले आहे.
-
जान्हवीने काही पारंपारिक रंगीबेरंगी दागिन्यांसह संपूर्ण वेशभूषा केली. तिने स्टेटमेंट पर्ल इअर चेन असलेल्या मॅचिंग कानातल्यांच्या जोडीसह पन्ना आणि मोती चोकर घातला होता.
-
जान्हवीचा हा आतापर्यंतचा सर्वोत्तम एथनिक लुक होता. लाल रंगाची जड गोटा साडी त्यावर भारी नक्षीदार ब्लाउज जान्हवीचा लूक लक्षवेधी बनवत आहे.
-
डिझायनरच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार या ऑर्गेन्झा साडीची किंमत सुमारे १.१५ लाख इतकी असून नक्षीदार ब्लाऊजची किंमत ४६,५०० रुपये इतकी आहे. (Janhvi Kapoor Instagram)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी