-
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार स्टारर ‘स्त्री २’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करून थकत नाही आहेत.
-
पहिल्याच दिवशी थक्क करणारी कमाई करत हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
-
श्रद्धाच्या ‘स्त्री २’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली आणि या चित्रपटाचा आस्वाद घेतला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कमाई केली.
-
15 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतातील रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 76.5 कोटींची कमाई केली.
-
विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट 19 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8.62 कोटी रुपयांची कमाई केली होती. (IMDb)
-
करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘क्रू’ हा चित्रपट २९ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.28 कोटींची कमाई केली होती. (IMDb)
-
अजय देवगण आणि आर माधवन यांचा ‘शैतान’ हा चित्रपटही याच वर्षी मार्चमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 15.21 कोटींची कमाई केली. (IMDb)
-
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट यावर्षी 11 एप्रिलला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 16.07 कोटींची कमाई केली होती. (IMDb)
-
यावर्षी 25 जानेवारीला ‘फाइटर’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 24.60 कोटींची कमाई केली होती. यामध्ये दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होते. (IMDb)

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी