-
‘स्त्री-२’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट बनवण्यासाठी फक्त ५० कोटी रुपये खर्च झाले आणि अवघ्या ६ दिवसात या चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. याआधीही अनेक हॉरर-कॉमेडी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल.
-
२००२ साली मध्ये प्रदर्शित झालेल्या डिनो मोरिया आणि बिपाशा बसू यांचा चित्रपट ‘राझ’ बनवण्यासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३७ कोटी रुपयांची कमाई केली.
-
अक्षय कुमार, विद्या बालन आणि अमिषा पटेल यांचा ‘भूल भुलैया’ या चित्रपटाचे बजेट ३२ कोटी रुपये होते. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे ८२ कोटी रुपयांची कमाई केली होती.
-
४० कोटी रुपयांमध्ये बनलेल्या ‘भूतनाथ रिटर्न्स’ने थिएटरमध्ये १५३ कोटी रुपयांची कमाई केली होती. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि बोमन इराणी यांसारखे इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते.
-
‘स्त्री’ हा २०१८ च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होता. २५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १८१ कोटींची कमाई केली.
-
कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांचा ‘भूल भुलैया-२’ या चित्रपटाने सुमारे ७० कोटी रुपयांच्या बजेटमधून बॉक्स ऑफिसवर २६६ कोटी रुपयांची कमाई केली होती.
-
‘भेडिया’ या चित्रपटाचे बजेट ६० कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास ९० कोटी रुपये कमावले होते.
-
अजय देवगण, ज्योतिका आणि आर माधवन यांचा ‘शैतान’ चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाचे बजेट ६५ कोटी रुपये होते आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २११ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.
-
‘मुंज्या’ हा हॉरर चित्रपट यावर्षी ७ जूनला प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे बजेट जवळपास ३० कोटी रुपये होते आणि चित्रपटाने १३२ कोटींची कमाई केली.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…