-
अभिनेत्री वनिता खरात आणि अभिनेत्री स्नेहल शिदम या महाराष्ट्रातील दोन विनोदी अभिनेत्री आहेत.
-
मात्र खूप कमी लोकांना माहित असेल की वनिता आणि स्नेहल या खूप जुन्या मैत्रिणी आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच वनिताने स्नेहलबरोबरचे काही जुने फोटो पोस्ट करत त्यांच्या मैत्रीला १० वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले.
-
वनिता आणि स्नेहल अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो पोस्ट करत असतात.
-
दोघीही सध्या दोन वेगवेगळ्या आणि लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांचा भाग आहेत.
-
दहा वर्षांपूर्वीच्या या फोटोंमध्येही वनिता आणि स्नेहल आतासारख्याच दिसत आहेत.
-
महाराष्ट्रातील प्रेक्षक या दोन्हीही विनोदी अभिनेत्रींवर मनापासून प्रेम करतात.
-
या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटलंय, “मला वाटायचं तुम्ही दोघी बहिणी आहात.”
-
तर दुसऱ्याने म्हटलं आहे, “इथे तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येउद्या’ एकत्र आले आहेत.”
-
महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या दोन विनोदी अभिनेत्रींना ओळखलं का? (फोटो : वनिता खरात आणि स्नेहल शिदम सोशल मीडिया)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL